शिवार फेरी करीत ग्रामस्थांच्या मदतीने बांधला वनराई बंधारा ; पशुधनासाठी चाऱ्याची शेतात केली पेरणी
धामणगाव रेल्वे
तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर येथे जिल्हा परिषदेचे सी. ई.ओ. सत्यम गांधी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. दरम्यान शिवार फेरी करीत वनराई बंधारा बांधला, एका शेतात चाऱ्याची स्वतः पेरणी केली व जी.रामजी योजना अंतर्गत शेतात जलतारा योजनेचे भूमिपूजन केले. दुष्काळ निवारण व पाणी टंचाई अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
पेरणी पूर्वीची तयारी करतानाजिल्हा परिषद सीईओ सत्यम गांधी
जिल्हा परिषदेचे सी. ई.ओ. सत्यम गांधींनी मंगरुळ दस्तगीर या गावाला गुरुवारला (ता.५) भेट दिली. दरम्यान त्यांनी शिवार फेरी करीत वनराई बांधला, एका शेतात चाऱ्याची स्वतः पेरणी केली. शेतकरी अजय मेश्राम यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. व्हीबी-जी रामजी योजना अंतर्गत शेतात जलतारा योजनेचे भूमिपूजन केले. दुष्काळ निवारण व पाणी टंचाई अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. यानंतर ग्रामपंचायतीच्या आवारात ग्रामस्थांशी संवाद साधला.

दुष्काळ निवारण आणि पाणी टंचाई हा अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा विषय आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी तातडीचे उपाय आणि दीर्घकालीन नियोजन या दोन्ही पातळ्यांवर एकत्र काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामस्थांच्या समस्येचे निराकरण केले. पशुधनासाठी चाऱ्याचे नियोजन कसे करावे, याचे प्रात्यक्षिक शरद पालखडे व त्यांच्या चमूने सादर केले. यावेळी प्रोजेक्टरच्या माध्यमातून उपस्थित शेतकरी,गावकरी यांना जलतारा व आदी योजनेची माहिती देण्यात आली.
शेतकरी अजय मेश्राम याना शाल श्रीफळ देऊन सत्कार करताना
यावेळी तहसीलदार अभय घोरपडे, गटविकास अधिकारी डॉ.प्रफुल्ल भोरखडे, सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश वानखडे, पशुधन विकास अधिकारी धीरज दातिर, तालुका आरोग्य अधिकारी शहनाझ अन्सारी, ग्रामपंचायतचे प्रशासक प्रवीण आखरे, गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी निलेश वाघ, प्रल्हाद तेलंग,सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय गुल्हाणे, गजानन सांगळे, ग्रामपंचायत अधिकारी सुनील गोरे,सचिन तसर, राहुल धोटे, माजी उपसभापती माधुरी दुधे, माजी सरपंच सतीश हजारे, ग्राम महसूल अधिकारी सारिका रघुवंशी,पी.डी. आलोणे, सहाय्यक कृषी अधिकारी जे. डी.गडमळे व आदी प्रामुख्याने उपस्थित होते.संचालन डी.एस.राठोड यांनी केले तर आभार विशाल सुटे यांनी मानले.
वनराई बंधारा बांधताना सीईओ सत्यम गांधी तसेच त्यांची मदत करताना डॉ. प्रफुल भोरखडे, गटविकास अधिकारी, धामणगाव रेल्वे














Add Comment