धामणगाव प्रतिनिधी
धामणगाव मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडी पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या विधानसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने जन आशीर्वाद यात्रा तथा सभेचे आयोजन करण्यात आले. कामनापूर, काशिखेड, नारगावंडी, सावळा, आसेगाव, जळका (पटाचे) देवगाव, महिमापुर – मलापुर, वाढोणा, तळेगाव या गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी गावातील लोकांनी विविध समस्या, अडचणी रखडलेली विकास कामे यावर चर्चा केली. मतदार संघात विकास झालेला नाही. असा जनतेचा सूर मोठ्या संख्येने उमटला.














Add Comment