दारुच्या नशेत वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ प्रकरण
अकोला : जनसूर्या मीडिया
दारूच्या नशेत शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन आणि शिवीगाळ करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाचे निलंबन करण्यात आलं आहे. प्रभुदास गंडलिंगे असं निलंबित झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचं नाव आहे. अकोल्याचे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी ही कारवाई केली.
पोलिस अधिकारी गंडलिंगे यांने एका शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यासोबत शाब्दिक वाद घातला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. हा वाद झाला त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक गडलिंगे हा दारुच्या नशेत होता. त्याने नशेत शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करत निलंबनाच्या कारवाईची धमकी दिली होती.














Add Comment