धामणगाव रेल्वे

वरुड बगाजी जवळ बस आणि दुचाकींचा अपघात

बस चालकाच्या चुकीमुळे वृद्ध प्रवाशांचे ५ तास हाल बेहाल

धामणगाव रेल्वे 

धामणगाव वरून बगाजी मार्गे आर्वी जाणाऱ्या बसची एका दुचाकीला मागून धडक लागल्याने मोठा गोंधळ उडाल्याची घटना आज रोजी सकाळी १०:३० सुमारास उघडकीस आली. दरम्यान दुचाकीस्वाराने चक्क बस मंगरूळ पोलीस स्टेशन ला नेल्याने बसमाधील वृद्ध प्रवाशांचे मात्र ५ तास उन्हा तान्हात हाल बेहाल झाले होते. प्राप्त माहितीनुसार चांदुर रेल्वे आगारातील बस क्र. एम एच ४० ए क्यू ६२०८ ही धामणगाव वरून आर्वी जात असताना सकाळी १०:३० सुमारास वरुड बगाजी जवळ बस चालकाच्या चुकीमुळे एका दुचाकीस्वाराला मागून धडक लागली. त्यामुळे तिथे काही काळ गोंधळ उडाला. त्यातच त्या दुचाकीस्वाराने चक्क बस ला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन घेल्याने बसमधील सर्व प्रवाशी हे तिथेच उतरवून दिले. जवळपास ५ तास कोणतीच बस न आल्याने वृद्ध प्रवाशांना उन्हा तान्हात हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या.

झाडाचा सहारा घेऊन तात्काळ वाट पाहताना वृद्ध प्रवाशी 

एस टी महामंडळाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर

एकीकडे बस फेल झाली किव्हा अपघात झाल्यास बस मधील प्रवाशांची जबाबदारी ही एस टी महामंडळाची असते मात्र असे असतानाही चालक आणि वाहक यांनी बेजबाबदार पणे बस पोलीस स्टेशन ला नेऊन प्रवाशांना ५ तास उन्हात ताटकळत उभे ठेवल्याने प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. दुपारी ३ वाजता दुसरी बस आल्यानंतर प्रवाशी त्यामध्ये बसून गेले.तत्पूर्वी वृद्ध प्रवाशी असून त्यांना बीपी शुगर सारखे आज़ार असताना उन्हात विना खाण्यापिण्याशिवाय एका झाडाचा सहारा घेऊन उभे राहावे लागले. डेपो मॅनेजर यांना फोन केला असता त्यांचा नंबर बंद येत होता. त्यामुळे प्रवाशांची जबाबदारी असल्याचा विसर एस टी महामंडळाला पडला कि, काय हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सावलीच्या शोधात रस्त्यावर वाट पाहत बसताना प्रवाशी

प्रहार तालुकाप्रमुख सुरज गंथडे धावले प्रवाशांच्या मदतीला

सदर घटनेची माहिती प्रहार तालुका प्रमुख सुरज गंथडे यांना मिळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन घटनास्थळी पाठवून प्रवाशांची तहान भागवली. दरम्यान सुरज गंथडे यांनी सुद्धा डेपो मॅनेजर यांना फोन केले असता त्यांचा फोन बंद आल्याने चालक, वाहक तसेच डेपो मॅनेजर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी सुरज गंथडे यांनी केली आहे.
दरम्यान काही वेळानंतर पोलीस स्टेशन मधील बस सुद्धा गायब झाल्याने दुचाकीस्वार आणि बस चालक यांचे प्रकरण मॅनेज झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरु होती. मात्र सगळ्यांमध्ये हाल सर्वसामान्य प्रवाशांना भोगावे लागले तेवढेच खरे…
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!