सांस्कृतिक

धन्याचा बैलपोळा

ग्रामीण भागातील बैलपोळा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. खेड्यापाड्यातील बैल कमी झाले आहे व्हाट्सअँप वर टाकलेल्या कथा, कवीता लेख, कादंबऱ्या वाचकांचे प्रमाण कमी झाले म्हणून भरपूर लेखकानी लिहिले बंद केले तरी पोळ्या निमित्त हा लेख हक्काच्या वाचकांसाठी
बैलपोळा म्हणजे ग्रामिण भागातील शेतकरी माणसाचा जिव्हाळयाचा उत्सव–पोळ्याच्या आधल्या दिवसा पासुनच बैलाच जुपंनीच काम बंद व्हायच- फक्त बैल चारण्यासाठी म्हणुन शिवारात न्यायची प्रथा हिरव्या चाराॅने बैल फुगवुन घरी आले कि दोनतीन दिवसाआधी पासुन बैलानां ढेप सरकीचा कडबा कुटार गव्हाचा ऊंडा अलप –त्याला दिवसभर आराम दुसराॅ दिवसी नदीवर विहीरीवर बैलजोडी पाण्यात पौहनी घातली कि रात्री हळद आणि तुप गरम करुन बैलाची खांदमर्दन व्हायचे खांद शेकुन झाले कि घरची संवाशीन बाई जोडीची पुजा बांधायची -पळसाच्या फादया (बेगड) दरवाजात उभ्या,ठेवुन बैल औवाळनी व्हायची मग रात्री घरचा धनी दोन्ही हाताचा पोगा करुन मौठयाने ओरडून बैलानां आमंत्रण हा आवाज रात्री शेतकर्यांच्या घराघरातुन गावाच्या कानाकोपऱ्यात जायचा. माणसाच्या उपाशी पोटाचा पोशिंदा म्हणजे बैल त्याला आजच्या दिवशी गोडधोड देवून दर पोळ्याला आमंत्रित करण्याचा प्राचिन रिवाज.
आज आवतन आहे ऊदया जेवन कराले येजा हो नंदीबैल हौ– घरचीबाई घरधनी कडक उपास धरून बैल जेवनार नाहीत तोपर्यंत उपासी राहायचे.
बैल मान हलवुन होकार भरत नाही तो पर्यत घरधनी बैलाच्या कानाजवळ आवाज दयायचा याआवाजाने गाव मोहल्ला घरदार पिजांरुन निघायच-मग पुरणपोळीचा घास चारुन पुजन पुर्ण व्हायचे बैलाला दंडवत करुन उपकार मानायची रित-मग बैल सजविण्याची तयारी- बैलाची रंगरोटी धमाक्यात सुरु व्हायची– बैल रंगरोटी सकाळ पर्यत चालायची टोकदार शिंगावर रंगीत बेगड लावले कि बेैलजोडी एकदम उठुन टवटवीत व्हायचे- जुन्या वैसना टाटे मंढाटे घुंघुर बाजनी काढुन नवा दोर,नवी वैसन,नवा गळपट्टा,नवे घुंघरु,नवा मुस्के, बांधुन बैलजोडी तोरणी जायला तयार बैलाच्या पाठीवर लाल गेरवाचे हाताचे पंजे- तर कधी ग्लास वाटी गेरवात भिजवुन पाठिवर ठप्पे सिंगावर रंगीबेरंगी बेगळी चढवुन टिवटी—- त्याला गोल चकोर आरसे तर रंगीत तुरे मोरपिसाचे झुबके गळयात कवळयाची माळ-पाठीवर नवी रंगेबीरंगी झुल घातली कि जोडी नवरदेवा सारखी तोरणी जायला तयार— वर्षेभर बैलाची जीवेभावे सेवा करणारा नौकराला घर मालका कडुन नवे पाढंरे कपडे मिळायचे मग वाजत गाजत बैल गाव वैशीवर तोरणी लागायचे आमच्या तिवस्यात बैलपोळा अगदी पोलिस स्टेशनच्या समोर खाली जागेत हायवे रोडला लागुन भरायचा तो बैलपोळा आजही तिथेच भरतो फक्त बैलजोडया कमी झाल्या गडीमाणसाची तोरणाखाली बैल रांगेत उभे करण्याची लगभग पाटलांची मानाची बैलजोडी येई पर्यत पोळा फुटत नसे—पाटलाची बैलजोडी वाजत गाजत आली कि मग गोठाणपुजा व्हायची तो पर्यत–सभ्य संस्कुतीतील भारतीय पुरुष कभंरेखालचे शिव्यादर्शन करायचे — तोरण्याच्या दोन्ही बाजु कडुन अस्सल रंडेबाज दारुबाजं माणसाची टोळी झडत्या देण्याच्या तयारीत असायचे मग शिव्या देवून झडत्या सुरु व्हायच्या एकमेकाच्या आयाबहिनी निघायच्या रंगीत सदाबहार कमरेखालच्या शिव्या ऐकुन कान धन्य व्हायचे– दोन्ही बाजुने शिव्याची मेजवानी आंग चढुन झोबायची दारु पिऊन गटारात पडून मारामारी ठोकाठोकी व्हायची पण हे भाडंण दिर्घ काळासाठी टिकत नव्हते—आता बैलपोळा फक्त ग्रामिण भागातच पाहायला मिळतो बैलजोडया कमी झाल्या असल्या तरी बैलाविषयी आदराची भावना अजुन कायम आहे. पण पुढच्या पिढीत बैलाला घरचा सदश्य म्हणुन समजण्याची पंरपरा बंद होणार हे मात्र नक्की— आता टेक्टरने बैलाची जागा घेतली आहे पण सध्यातरी टेैक्टरपोळा भरत नाही. हे नव्या पिढीचे भाग्य —आपण आणखी इतिहासात मागे जावुन पाहु -मानवी जीवन उत्क्रांतीचा आरंभ कसा झाला अग्नीचा शोध जितका महत्वाचा होता त्याही पेक्षा महत्वाचा शोध चाकाचा होता.आदीम काळापासुन जंगलामध्ये राहणाऱ्या मानवाला शतकानुशतके टोळया करुन रहावे लागले पण चाकाचा शोध लागला आणि मानवाच आयुष्य कायमचं स्थिरावल— बैलांच्या सहाय्याने शेती करण्याचे तंत्र गवसले आणि कृषीसंपन्न संस्कृतीचा झपाट्याने उगम झाला. आज यंत्रांच्या सहाय्याने शेतीतंत्र गवसले असले तरी शतकानु- शतके बैलांच्या ताकदीनेच शेती होत आली आहे. म्हणुन बैलाला एक उपकारी आगळ वेगळ महत्व आहे. सण उत्सवाची परंपरां देशात आजही कायम आहे. श्रावणी आमावस्येला होणारा बैलपोळा हा भारतीय परंपरेतील एक महत्वाचा सण ठरतो अन्नधान्य पिकविण्यात ज्याची मदत होत असते त्या बैलाबाबत कृतज्ञता व्यक्त करणारा हा पोळासण महाराष्ट्राची खास ओळख आहे. बघा–ना किती कित्ती विवीधतेने पुर्ण असा सण आहे–आदल्या दिवशी बैलानां आवतन त्यानंतर पाणवठयावर अंघोळ मग खांद्याला तूप -हळदीने खांदेमळणी यानंतर पाठीवर लालसर गेरूचे नक्षीकाम रंगीत झूल शिंगाना बेगड गळयात घुंगरमाळा तर कधी पितळी घंटा सजलेल्या बैलांना मग पुरण पोळीचा नैवेद्य…मग सहा वाजता गावातील सर्व बैलजोडया तोरणाखाली एकत्र आणल्या जातात आणि मग सुरु होतात. दारु ढोसून झडत्या– मग गाव पुढारी मानकाऱ्यांचा बैलजोडीला पुढे काढून ‘बैलपोळा’ फुटतो फटाकयाचा गजर वाजंत्री, ढोल-ताशे,सनई, बाजा चौघडा मिरवणूक.गावभर फिरुन उत्सव साजरा करतात.आणि मग बैलजोडी घेवून घरोघरी बोजवारा मागण्याची प्राचीन पध्दत. आता बोजारा म्हणजे काय—- जो बैलाच संगोपन करतो चारापाणी घालतो वर्षभर सांभाळ करतो म्हणजे बैलाचा बोजा उचलतो त्याला पोळ्याच्या दिवसी पैसे दिल्या जाते त्याला बोजारा म्हणतात.
मग घरची बाई दारात येवुन बैलाचे पाय धुवुन टिका पुजा करते. आरती ओवाळली करून पुरणपोळीचा गोड घास भरविल्या जातो. कारण घरच वैभव हे बैला मुळच असत आरती करुन गडयाला पैसे (बोजारा ) देण्याची पध्दत ग्रामीण भागात आजही सुरु आहे अनेक राज्यात गावांमध्ये हा बैलपोळा आजही साजरा होतो ज्यांच्या घरी बैल नाहीत अशा घरात मातीचे बैल करून पूजेसाठी वापरली जातात पोळयाच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा तान्हापोळा भरतो लहान मुलांच्या हाती लाकडी बैल मातीचे बैल–सजवून सांस्कृतिक वारसा जोपासल्या जातो काही ठिकाणी मुलांसाठी स्पर्धा होते याला बाळपोळा तर कुठे तान्हापोळा म्हणतात. यात उत्तम सजावटीसाठी बक्षीसे देखील दिली जातात. बैलपोळा म्हणजे निसर्ग आणि मानवाचा पक्का ऋुणाणुबंध काही वर्षांपूर्वी शेतीची कामे बैलांच्या मदतीने व्हायची शेताला पाणी देण्यासाठी बैलांचा वापर व्हायचा चामडयापासून तयार केलेल्या पखालीने विहिरीतून पाणी खेचण्याचे काम बैलांच्या ताकतीने केले जाई .हे पर्यावरण पूरक होते. यातून भूजल साठा मर्यादीत प्रमाणातच वापरला जायचा.
बदलल्या काळानंतर विंधन विहीरी आणि शेती पंपांनी उपसा सुरु झाला आणि भूजल साठा रिता होत गेला.आजही बैलांच्या माध्यमातून शेतीचा पर्याय वापरला गेला तर सर्वांचेच भले होणार यात शंका नाही. पण यंत्रशक्ती हि विकसित करावी लागेल पण शेतकऱ्याचा हा सखा*श बैल आजही मोलाचा आहे म्हणुन पोळयाचा सण शेतकराॅसाठीच नाही तर जगासाठी श्रमाच महत्व पटवुन देणारा उत्सव आहे.

लेखक : प्रा. रवी दलाल, काटोल नागपूर

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!