धक्कादायक

शिक्षिका म्हणाली माझ्या पोटात बाळ त्या अल्पवयीन विध्यार्थ्याचंच !

२३ वर्षांची शिक्षिका १३ वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत पळाल्याचे प्रकरण

जनसूर्या मीडिया

गुजरातच्या सुरतमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक २३ वर्षीय महिला शिक्षिका आपल्या १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेली. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांनाही गुजरात-राजस्थानच्या शामलाजी सीमेवरून अटक केली. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता शिक्षिका पाच महिन्यांची असल्याचे कळाले. हे मूल आपल्या अल्पवयीन विद्यार्थ्याचेच असल्याचा दावा शिक्षिकेने केला आहे. पोलीस आता डीएनए चाचणी करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी शिक्षिका विद्यार्थ्याला सोबत घेऊन पळून गेली. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी शिक्षिकेवर मुलाचं अपहरण झाल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करत दोघांचा शोध सुरू केला. अखेर गुरुवारी शिक्षिका आणि विद्यार्थ्याला अरावली जिल्ह्यातील गुजरात-राजस्थानच्या शामलाजी सीमेवरून अटक केली. यानंतर दोघांनाही सुरतला आणले.
पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता ती विद्यार्थ्यासोबत सुरतहून अहमदाबादला गेली. मग अहमदाबादहून ते दिल्ली, वृंदावन आणि जयपूरला गेल्याचे सांगितले. जयपूरहून परतत असताना, पोलिसांनी दोघांनाही शामलाजी सीमेवर पकडले. तपासादरम्यान, पोलिसांना कळले की महिला शिक्षिका गर्भवती आहे. पोलिसांनी महिला शिक्षिकेला पोटात वाढणाऱ्या बाळाबद्दल विचारले तेव्हा महिलेने सांगितले की ते मूल अल्पवयीन विद्यार्थ्याचेच आहे.
हे ऐकताच पोलीस हैराण झाले. महिला शिक्षिकेच्या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याला वडिलांच्या ताब्यात दिले, तर महिला शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!