मारहाण केल्यानंतर चे फोटो सोशलमिडीयावर व्हायरल
जनसूर्या मीडिया
गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्हा गुन्हेगारीच्या घटनांमुळे महाराष्ट्रच नाही तर देशभरात चर्चेत आहे. संतोष देशमुख खून प्रकरणाचा धुराळा बसत नाही तोपर्यंतच आता अंबाजोगाई तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण केली गेलीय. यात पाईपच्या माराने अंग काळनिळं पडल्याचे ही पुढे आले आहे. किरकोळ वादातून उफाळून आलेल्या या अमानुष मारहाणीचा प्रकार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट केल्यानंतर समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आला असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.














Add Comment