चांदुर रेल्वे येथे लवकरच प्रशस्त सर्व सुविधा युक्त बस स्थानक उभारणार -आमदार प्रतापदादा अडसड
चांदुर रेल्वे प्रतिनिधी
आमदार प्रताप अडसड यांच्या प्रयत्नातून ५ नवीन बस चांदूर रेल्वे बसस्थानकावर दाखल झालेल्या असून त्या नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा आज आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते संपन्न झाला. आजही ग्रामीण भागातील बहुतांशी प्रवाशी ये-जा करण्यासाठी वाहतूकीचे प्रभावी साधन म्हणून लालपरी बसला प्राधान्य देतात. म्हणूनच आपल्या मतदारसंघातील नागरिकांसाठी नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात याकरीता परिवहन मंत्री महोदयांकडे आमदार प्रताप अडसड सातत्याने पाठपुरावा करीत होते. या पाठपुराव्याला यश आले असून पहिल्या टप्प्यात नवीन ५ बसेस उपलब्ध झाल्या आहे.

यामुळे आपल्या तालुक्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी बळकट होण्यास मदत होईल असे मत यावेळी आमदार प्रतापदादा अडसड यांनी व्यक्त केले. तसेच मागणी केलेल्या उर्वरीत बसेस देखील आपल्या एसटी डेपोच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत असे आश्र्वासित केले.













Add Comment