खेळ / क्रीडा

देवगाव येथे रंगणार भव्य प्लास्टिक बॉल चे खुले सामने

भूमिपुत्र क्रिकेट क्लब द्वारे सामन्यांचे आयोजन

धामणगाव रेल्वे – प्रतिनिधी

तालुक्यातील देवगाव येथे २५ जानेवारी २०२५ रोजी भव्य प्लास्टिक बॉल च्या खुल्या सामन्यांचे आयोजन भूमिपुत्र क्रिकेट क्लब द्वारे करण्यात आले आहे. तर २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ईडन गार्डन देवगाव ता. धामणगाव रेल्वे मैदानावर क्रिकेटचे सामने रंगणार असून विजेत्या टीम ला रोख रक्कम २१००० तर उपविजेत्या टीम ला रोख रक्कम १५००० तसेच तिसऱ्या क्रमांकाच्या टीमला रोख रक्कम १०००० असे पारितोषिक मिळणार आहे.
             सदरच्या सामन्यांचे उदघाटकप्रसंगी सौ. वानिताताई राऊत सरपंच देवगाव, तसेच विशाल जयस्वाल, उपसरपंच यांच्या हस्ते होणार आहे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माया चाटसे ( एपीआय) नारायणी पवार ( तलाठी ) दिलीप पाटील , गजु मलवार, नितीन लांबट, विजय रूपवने यांच्या उपस्थिती असणार आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!