ब्रेकिंग न्युज

नक्षली हल्यात धामणगाव तालुक्यातील जवान दिनेश राऊत गंभीर जखमी..

उपचाराकरिता तातडीने दिल्ली येथील एम्स रुग्णालयात हलविले

धामणगाव रेल्वे 

तालुक्यातील झाडा या गावातील जवान सीआरपीएफ कोब्रा कमांडो दिनेश राऊत हे आपल्या देश सेवेत कार्यरत असताना झारखंड राज्यातील साईबासा जवळील सारडा जंगलात नक्षलांसोबत झालेल्या बॉम्ब स्फोटात ते गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती प्राप्त आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑपेरेशन दरम्यान बॉम्ब चा धमाका झाल्याने दोन जवान जखमी झाले होते. त्यावर तातडीने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यावर उपचार करण्यात आला. मात्र दिनेश राऊत यांची प्रकृती चिंताजनक असल्याकारणाने पुढील उपचारासाठी त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात पाठवण्यात आले. उपचारा दरम्यान दिनेश राऊत यांच्या शरीरात जहर पसरत चालले असल्याने त्यांचा डावा पाय कापण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

error: Content is protected !!