देश

नवीन गाडीची पार्टी मित्रांच्या जीवावर बेतली ; अपघातात ६ तरुणाचा मृत्यू

जनसूर्या मीडिया

देहराडूनमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या घटनेत सहा तरुणांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबियांनी तक्रार दाखल केलेली नसल्याने पोलिसांनी अजून या प्रकरणात कोणतीही कारवाई केलेली नाही.
आज पहाटे एक कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता. या प्रकरणी कारवाई करण्यासाठी पोलीस कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत. प्राथमिक तपासातील अंदाजानुसार चालकाची कोणतीही चूक नसल्याचं निदर्शनास येत आहे. अपघातात जीव गमावलेल्यांमध्ये तीन तरुण आणि तीन तरुणींचा समावेश आहे. शिवाय एक जण गंभीर जखमी झाला आहे.
देहराडूनमध्ये आज सकाळी ओएनजीसी चौकामध्ये रात्री दीड वाजता ही घटना घडली. भरधाव वेगातील एक इनोव्हा कार एका कंटेनरला मागच्या बाजूने धडकली. यात सहा तरुणांचा मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये एका तरुणाचं आणि तरुणीचं शीर छाटलं गेल्याची माहिती आहे. हे दोघे सनरुफच्या बाहेर होते, असं सांगितलं जात आहे. या गाडीचा वेग १५० किलोमीटर असा होता.

नवीन गाडीची पार्टी – मित्रांचा आग्रह आला अंगलट

शहरातील फटाक्यांचे व्यवसायिक सुनील अग्रवाल यांचा मुलगा अतुल अग्रवाल याने आपल्या सहा मित्रांना नवीन गाडीची पार्टी देण्यासाठी नेलं होतं. अग्रवाल यांनी ३० ऑक्टोबर धनत्रयोदशीच्या दिवशी गाडी खरेदी केली होती. अतुलचे मित्र त्याला पार्टी मागत होते. त्यामुळे त्याने मंगळवारी मित्रांना पार्टी दिली आणि माघारी येत असताना अपघात झाला.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!