देश धक्कादायक

जास्त पैशाच्या नादात नको ते कृत्य ; बकऱ्या चारणाऱ्या वृद्धासमोर नग्न होऊन व्हिडिओ करणारी तरुणी निघाली सॉफ्टवेअर इंजिनीअर

तरुणी आणि तिच्या मित्राला न्यायालयीन कोठडी

जनसूर्या मीडिया

राजस्थानच्या जैसलमेरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एक न्यूड गर्लने गुराखी वृद्धसमोर अश्लील कृत्य केलं आहे. या भयंकर घटनेचा व्हिडिओ शूट करून पॉर्न साईट्सवर शेअर करण्यात आला. या घटनेची माहिती राजस्थान पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने तरूणीला अटक केली. तसेच तिच्या साथीदारालाही ताब्यात घेतलं आहे. मुख्य म्हणजे, अटक केलेली तरूणी ही पेशाने सॉफ्टवेअर इंजीनिअर असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं घडलं काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये तरूणी कारमधून आपल्या साथीदारासोबत येते. ती कारमध्ये नग्न अवस्थेतच असते. नंतर कारच्या बाजूने एक वृद्ध आपल्या शेळ्यांना चरायला नेत असतो. यादरम्यान, तरूणी वृद्धाची वाट अडवते आणि त्यांच्यासमोर अश्लील चाळे करते. कारमधील व्यक्तीही कारच्या बाहेर येऊन दोघांचा व्हिडिओ शूट करतो. त्यानंतर तरूणीचा मित्रही वृद्धाला मुलीसोबत अश्लील कृत्य करण्यास प्रवृत्त करतो. मग तो व्यक्तीही या दोघांमध्ये सामील होतो.
त्यानंतर हा व्हिडिओ त्या व्यक्तीने पॉर्न साईट्सवर अपलोड केला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजस्थान पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं आहे. नोएडा येथून ताब्यात घेत पोलिसांनी त्या दोघांना राजस्थानला घेऊन आले. त्यानंतर कोर्टात हजर केले. दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरूणी पेशाने सॉफ्टवेअर इंजीनिअर असून, पैशांसाठी ती अश्लील व्हिडिओ करत असल्याची माहिती समोर आली आहे.

पेशाने सॉफ्टवेअर इंजीनिअर पण तरीही..

आरोपी तरूण आणि तरूणी दोघेही दिल्लीतील एका फ्लॅटमध्ये राहतात. तरूणीला जास्त पैसे कमवायचे होते. त्यामुळे पार्टनरसोबत तिने पॉर्न व्हिडिओ तयार करायचे ठरवले. या दोघांनी आधी सिंगापूर, थायलँडसारख्या ठिकाणी अश्लील व्हिडिओ तयार केल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!