धक्कादायक

घरात चोरी झाल्याची घटना कळताच घरमालकाला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू


अकोला- प्रतिनिधी

           जिल्हातील मूर्तिजापूर तालुक्यातील घरात चोरीची घटना घडली. घरात चोरी झाल्याची माहिती मिळताच, घरमालक अशोक बोळे यांना जोरदार धक्का बसला. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
काल रात्री सुमारे पावणे आठ वाजता अशोक बोळे यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली. घरातून सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम असा मिळून अंदाजे ४ ते ५ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. चोरी झाल्याची माहिती मिळताच अशोक बोळे यांनी तात्काळ घराकडे धाव घेतली. मात्र वाटेतच त्यांना चक्कर आल्याने ते खाली जमिनीवर कोसळले. गावकऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारापूर्वीच त्यांचं निधन झालं.
या संदर्भात अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात पोलिसांसमोर चोरट्यांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. स्थानिक सीसीटीव्ही फुटेज, माहिती तंत्रज्ञान व गुप्त माहितीच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे घरफोडी तर दुसरीरडे त्या धक्क्यामुळे झालेला मृत्यू. अशा घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर चोरांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!