धक्कादायक

सामान्य नागरिक समजून पोलीस अधिकाऱ्यांनी लगावली कानशिलात ; मात्र समोरचा लष्कर अधिकारी असल्याचे माहिती पडताच पोलीस अधिकारी झाला गायब

चुकीच्या दिशेने कार चालवल्याचा जाब विचारणाऱ्याला पोलिसाने लगावली कानाखाली, ‘तो’ निघाला लष्कर अधिकारी,

जनसूर्या मीडिया
ऊत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये वर्दळीच्या रस्त्यावर एक कारचालक चुकीच्या दिशेने कार चालवत होती. यानंतर अचानक एका ठिकाणी त्याने कार थांबवली आणि समोरुन येणाऱ्या कारमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या कानाखाली लगावली. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्याने कानाखाली लगावली तो पोलीस अधिकारी होता. इतकंच नाही तर त्याने ज्याच्या कानाखाली लगावली तो लष्करात कर्नल होता. सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर हा पोलीस अधिकारी गायब झाला आहे.
कर्नल आनंद प्रकाश सुमन यांनी शनिवारी ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी पोलीस अधिकाऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत, कर्नल आनंद प्रकाश सुमन यांनी आरोप केला आहे की त्यांच्या पत्नी आणि मुलीसमोर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांनी त्यांची गाडी चुकीच्या बाजूने चालवल्याबद्दल जाब विचारला तेव्हा पोलीस अधिकाऱ्याने त्यांना मारहाण केली असं त्यांनी तक्रारीत सांगितलं आहे. आनंद प्रकाश सुमन हे पाटण्यातील एनसीसी संचालनालयात कर्नल पदावर तैनात आहेत. पोलीस अधिकाऱ्याने आपल्या डाव्या पायावरुन गाडी चालवली असाही त्यांचा आरोप आहे. “त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मी काच खाली केली असता त्याने माझ्या कानाखाली लगावली,” असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
कर्नल आनंद प्रकाश सुमन यांनी आपल्याला चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला आहे. ते म्हणाले की, “मी त्याला थांबवण्यासाठी कारच्या बाहेर आलो असता, त्याने त्याच्या आणि माझ्या कारमध्ये मला चिरडण्याचा प्रयत्न केला. यानंतर तो माझ्या पायावरुन गाडी चालवत पळून गेला”. आरोपी पोलीस अधिकाऱ्याची ओळख पटली असून, त्याचं नाव विनय कुमार सरोज आहे. पोलीस अधिकारी बेपत्ता असून, त्याचा मोबाईलही बंद असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
“कर्नलच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई केली जात आहे. जो कोणी दोषी आढळेल त्याला कठोर शिक्षा केली जाईल,” असं लखनऊचे दक्षिण पोलिस उपायुक्त निपुण अग्रवाल म्हणाले आहेत.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!