तक्रारदार देवेंद्र भोंडे यांची चिखलदरा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाविरोधात चौकशीची मागणी
अमरावती प्रतिनिधी –
पंचायत समिती चिखलदरा अंतर्गत जि.प. शाळा बागलिंगा आणि जि.प. शाळा कोहणा येथे विद्यार्थ्यांना घरून भाजी, डाळ, चटणी आदी अन्नपदार्थ आणावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगत संबंधित शाळा व शिक्षण विभागाच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदार प्रेम थॉमस, दलित पँथर जिल्हाध्यक्ष तथा देवेंद्र यो. भोंडे, जिल्हा सचिव, इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन, अमरावती यांनी याबाबत आयुक्त, अमरावती विभाग यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे. तक्रारीनुसार, संबंधित शाळांना शासनाकडून विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी निधी, धान्य व इतर साहित्य उपलब्ध होत असताना काही विद्यार्थी मधल्या सुट्टीत घरून अन्न घेऊन येत असल्याचे निदर्शनास आले. लहान विद्यार्थी घरातील अन्न स्वतः घेऊन शाळेत आणत असल्याने अन्नाची स्वच्छता व सुरक्षितता तपासली जाते का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.















Add Comment