हटके

दहावीत मुलाला ५० % मार्क : पालकांनी थेट जेसीबीतून काढली मिरवणूक

उरण जनसूर्या मीडिया

 

        नुकताच आज २७ मे ला दहावीचा निकाल जाहीर झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत दहावीचा निकाल हा जास्त लागला आहे. यामध्ये बहुतांश विद्यार्थी पास झाले आहे. विद्यार्थांनी आपआपल्या परीने आनंद साजरा केला, तर काही पालकांनीही अती उत्साह दाखवला. अशीच एक घटना अलिबाग उरण येथून समोर आली आहे.
इथे दहावी पास झाल्यानंतर पालकांनी जेसीबीमधून आपल्या मुलाची मिरवणूक काढली. आश्चर्य म्हणजे या मुलाला ५० टक्के मिळाली. तरीही त्याचं एवढ्या जोशात मिरवणूक काढली जात आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर ही शेअर केला गेला आहे. ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. दहावीला ५० टक्के मिळालेल्या या मुलाचं नाव सार्थक नारंगीकर आहे. तो उरणचा रहिवासी आहे.
सार्थक दहावीला असताना मोबाईल मध्ये गुंग असायचा अभ्यासच करत नसल्याने मित्रांनी तू नापास होशील अशा पैजा लावल्या, मात्र सार्थकने आपण पास होणार असल्याचे सांगितले. नुसते पास नाही तर फर्स्ट क्लास ने पास होणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. त्यावर मित्रांनी दिवसभर मोबाईल मध्ये असल्याने तू नापासाच होशील असं ठामपणे सांगितलं.
शेवटी २७ मे ला दहावीचा निकाल लागला आणि सार्थकने ५० टक्क्यांनी पास होऊन अखेर आपला शब्द खरा करुन दाखवला. शेवटी ज्या मित्रांनी त्याला हिणवण्यासाठी घरच्यांनीही सार्थकची थेट चक्क ढोल ताशांच्या गजरात जेसीबी वरून मिरवणूक काढली आणि एकच जल्लोष केला. गावकऱ्यांनी ही सार्थकचे अभिनंदन केले. राज्यात कुठे अभ्यास न करता पास झालो म्हणून अती उत्साह आहे तर, कुठे अभ्यास करुनही कमी मार्क्स मिळाले याचं दुखं ही केलं जात आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!