प्रशासन

मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणे “त्या” दोन महसूल अधिकाऱ्यांना पडले महाग, थेट निलंबन

राजशिष्टाचाराचं उल्लंघन केल्याचा ठपका – जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई

सिधुदुर्ग : जनसूर्या मीडिया

राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोघे महसुल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री दौऱ्याच्या वेळी संबंधित दोघेही परवानगी न घेता त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. त्यांना मुख्यालयात राहण्याचे आदेश असताना सुद्धा त्यांनी त्या आदेशाचे उल्लंघन केले आणि राज शिष्टाचार पाळला नाही, असा ठपका ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. यात सहाय्यक महसुल अधिकारी एस. पी. हांगे आणि ग्राम महसुल अधिकारी व्ही. व्ही. कंठाळे या दोघांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी लाच घेताना हे दोघेही अधीकारी लाचलुचपत च्या जाळ्यात सापडले होते. सध्या त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. अशा लाचखोर अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्याचा सत्कार केला होता. यावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त करत हा प्रकार उघड केला होता. तर या मागचा आका कोण असा सवाल उपस्थित केला होता.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!