धामणगाव रेल्वे

बोरगाव धांदे ग्रा. प. कडून बैल बाजाराचा नियमबाह्य हर्रास ? ग्रामस्थांची तक्रार

गटविकास अधिकाऱ्याकडे कारवाईची मागणी

धामणगाव रेल्वे

दलित वस्ती रस्ता घोटाळा प्रकरणी चर्चेत असलेले ग्रा. प. बोरगाव धांदे पुन्हा एका वादात अडकण्याची चिन्हे दिसत आहे. पारदर्शक पणे बैल बाजाराची हर्रास प्रक्रिया न राबविता नियमबाह्य हर्रास करून वसुली करण्यात येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
सविस्तर असे कि, जानेवारी २६ मध्ये बैल बाजाराचा हर्रास करण्यासंदर्भात मुनादी देण्यात आल्या असून मात्र ठरलेल्या दिवशी सचिव चंदू चौधरी गैरहजर राहत असल्याने हर्रास झाला नाही. दरम्यान हर्रास का झाला नाही याची विचारणा केली असता ग्रा. प. स्वतः बैल बाजार चालविणार असल्याचे तोंडी सांगितल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. त्या नंतर हर्रास कधी होणार आहे यासाठी २ दा पत्र व्यवहार केलेले असतानाही ग्रा. प. ने कुठलीही माहिती दिली नाही. त्यानंतर १२ मार्च रोजी बैल बाजार भरवण्यात आला असताना स्थानिक व्यक्तीकडून पावती फाडण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे नेमका हर्रास कोनाला दिला. आणि त्याची प्रक्रिया ग्रा. प. ने का राबविली नाही याचा संभ्रम निर्माण झाल्याने सदर प्रकरणाची चौकशी करून कार्यदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार ग्रामस्थ अनिल कैलूके यांनी केली आहे.
या संदर्भात बोरगाव धांदे ग्रा. प. प्रशासक ऋषिकेश मस्के यांना विचारणा केली असता त्यांनी बैल बाजाराचा हर्रास झालेला असून तो गावातील अशोक डबले यांना देण्यात आला आहे असे सांगितले. त्यावर हर्रास कधी करण्यात आला आणि किती नागरिक उपस्थित होते याची विचारणा केली असता हर्रास प्रक्रियेला पहिल्यांदा १० ते १२ नागरिक उपस्थित होते त्यानंतर दुसऱ्यांदा नागरिक उपस्थित नव्हते, मला तारीख माहित नाही पण कागदोपत्री हर्रास झाला आहे असे सांगितले…
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!