हटके

अवघ्या काही दिवसांवरच लग्न असताना सासू जावयासोबत फरार

दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन सासू जावयासोबत रफूचक्कर – सासऱ्याची पोलिसात धाव

जनसूर्या मीडिया

साधारणतः समाजात आपण लग्न जुळलेलं असताना मुलगी आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना वारंवार ऐकतो परंतु सध्या प्रेम प्रकरणात कोण काय करेल काहीच सांगता येत नाही. असाच एक प्रकार उत्तरप्रदेश मधील अलिगडच्या मरडाक परिसरात घडली आहे. लेकीचं लग्न जमलं, साखरपुडाही पार पडला, मात्र सासूचं जावयासोबत सूत जुळलं, लेकीच्या लग्नाला काही दिवस बाकी असताना सासू जावयासोबत फरार झाली आहे.
१६ एप्रिल रोजी मुलीच्या होणाऱ्या लग्नाला काही दिवस बाकी असतानाच सासू अडीच लाख रुपये सोबत घेऊन जावयासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. अलीगडच्या मडराक परिसरातील ही घटना घडली.
अधिक माहितीनुसार, २ एप्रिल रोजी लग्न ठरलेल्या मुलगा आणि मुलीचा साखरपुडा पार पडला होता. ३ एप्रिल रोजी कुटुंबियांनी जावयाला एक मोबाईल भेट दिला होता. मात्र त्यानंतर ६ एप्रिल रोजी दोघेही घरातून बेपत्ता झाले. सासू आणि जावई यांच्यातील संवाद वाढू लागला. त्यानंतर दोघेही एकमेकांशी गुपचूप बोलू लागले.
मुलीच्या वडिलांनी या प्रकरणावर सांगितले की, दोघे फोनवर सतत बोलत होते. त्यांतर ते अचानक गायब झाले. सोबत घरातून रोख रक्कम आणि दागिने देखील गायब झाले. पोलिस आता सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन ट्रेसिंग आणि कुटुंब आणि ग्रामस्थांच्या चौकशीद्वारे दोघांचा शोध घेत आहेत.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!