अमरावती

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

अमरावती : प्रतिनिधी

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यालयातील अधिकारी, तपासी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाला विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या अध्यक्ष उषा ठाकरे, सदस्य पी. टी. पाटील, सदस्य पंकज निखार तसेच कामिनी निखार यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी तपासी अधिकारी अनिल किनगे, विजय सोनावणे, प्रमेश आत्राम, संजय देशमुख, राजेश मुळे, प्रशांत कलकोटवार आणि सदानंद मानकर उपस्थित होते. तसेच कार्यालयीन कर्मचारी रवींद्र कांबे, रामकृष्ण निकम, जमाल बानवा, राजेश तिडके आणि सुनील रोडगे यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

शिपाई हेड कॉन्स्टेबल मुळे, प्रवीण धामणकर, मंगेश वीरूळकर आणि सुरज काळे यांचीही उपस्थिती होती. स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यालयात उत्साहाचे वातावरण होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये आणि नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प केला.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!