रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाचा मोठा विजय
अमरावती प्रतिनिधी
जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या ठिकाणी २० बेडचां नवीन आयसीयू सुरू करण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून रिपब्लिकन सेना महानगर प्रमुख रुग्णसेवक सुरेश तायडे कार्यरत होते अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या ३५ लाखाच्या वर असून जिल्हा सामान्य रुग्णालयात फक्त पाच बेडचा आयसीयू होता. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचारा अभावी आपले प्राण गमवावे लागत होते. अमरावती जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आपल्या उघड्या डोळ्यांनी हा प्रकार पाहत होते मात्र कोणत्याच लोकप्रतिनिधींनी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मोठा आयसीयु निर्माण व्हावा व सर्वसामान्य जनतेला उपचार मिळावा अशी भावना निर्माण झाली नाही.
मात्र रुग्णसेवक सुरेश तायडे यांनी अनेक आंदोलने करून शेवटी जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी २० बेडचा नवीन आयुष्य अमरावती जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना तात्काळ सेवा मिळावी म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून, जन आंदोलनाच्या माध्यमातून, उपोषणाच्या माध्यमातून सुरू करून घेतला. आज अमरावती शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आयसीयू उपलब्ध झाल्यामुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचतील व गोरगरीब जनतेला चांगल्या प्रकारच्या उपचार मिळेल.
जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये २० बेडचां आयसीयू सुरू केल्याबद्दल रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक व डॉक्टर मोरे यांचा जाहीर सत्कार रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे सुद्धा सुरेश तायडे यांनी सांगितले.
Add Comment