अमरावती

यवतमाळ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आढावा बैठक संपन्न

अमरावती प्रतिनिधी : गजानन मानकर

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या यवतमाळ, अमरावती व अकोला या जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यवतमाळ येथे आढावा बैठक घेतली. याप्रसंगी समता परिषदेच्या भगिनींनी माझे औक्षण केले, तसेच सर्व समता सैनिकांनी ‘जय ज्योती, जय क्रांती’ जयघोष करत स्वागत केले.
या बैठकीत तीनही जिल्ह्यांमधील पदाधिकारी व समतासैनिक यांच्याशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने संवाद साधला. सर्वांची संघटनेच्या कामाबाबत मते जाणून घेतली. तसेच ओबीसी आरक्षण, ओबीसी हक्कांच्या दृष्टीने देखील चर्चा झाली. सर्वांना आगामी निवडणुकांमध्ये अधिकाधिक ओबीसी उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले आणि तसेच जोमाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. सर्वांनी समता परिषदेच्या विजयी वाटचालीचा निर्धार केला.
यावेळी तीनही जिल्ह्यांमधील समता परिषद पदाधिकारी, समता सैनिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!