नवी दिल्ली

फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय

 

नवी दिल्ली : जुगार किंवा सट्टेबाजीशिवाय केवळ मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयात स्पष्ट केले आहे. कर्नाटकातील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संचालक मंडळात निवडून आलेल्या हनुमंतरायप्पा वाय.सी. यांच्यावरील कारवाई रद्द करत, सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे पद त्यांना पुन्हा प्रदान करण्याचा निर्णय दिला. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या.एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने नमूद केले, की गव्हर्नमेंट पोर्सिलेन फॅक्टरी एम्प्लॉइज हाउसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर निवडून आलेले हनुमंतरायप्पा काही मित्रांबरोबर रस्त्याच्या कडेला पत्ते खेळताना आढळले होते.

न्यायालयाने काय म्हटले?

प्रत्येक वर्तन ज्यावर आक्षेप घेतला जातो, त्यात नैतिक अधःपतन असतोच असे नाही. नैतिक अधःपतन म्हणजे मूलतः नीच, भ्रष्ट किंवा अश्लील वर्तन असावे लागते. पत्ते खेळणे हा भारतात अनेक गरीब वर्गातील लोकांचा मनोरंजनाचा सामान्य मार्ग आहे.

पदावरून हकालपट्टी ही कृत्याच्या तुलनेत अतिशय कठोर व अन्यायकारक

हनुमंतरायप्पा हे जुगारी नाहीत, तसेच पत्ते खेळणे हा भारतात अनेक गरीब वर्गातील लोकांचा मनोरंजनाचा सामान्य मार्ग आहे,’ हेही न्यायालयाने अधोरेखित केले. हनुमंतरायप्पा यांची कोणतीही चौकशी किंवा तपास न करता त्यांना २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच निवडणूक रद्द करण्यात आली.
हनुमंतरायप्पा यांना सहकारी संस्थेच्या संचालक पदावरून काढून टाकण्याचा निर्णय कायम ठेवणारा कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय न्यायालयाने रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की हनुमंतरायप्पा यांची पदावरून हकालपट्टी ही त्यांच्या कृत्याच्या तुलनेत अतिशय कठोर आणि अन्यायकारक होती. म्हणून, हनुमंतरायप्पा यांचे अपील मान्य केले जाते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!