अमरावती

वाढती गुन्हेगारी पाहता गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी अमरावती शहरातील सीपी पुन्हा ॲक्शन मोडवर

अमरावती प्रतिनिधी

क्राईम मिटींग व व्हीआयपींचा बंदोबस्त झाल्यानंतर सीपी नविनचंद्र रेड्डींनी शहरातील रेकार्डवरील व हिट्रीशीटर गुन्हेगारांची पेशी घेण्याचे सत्र पुन्हा सुरूकेले आहे.
अशातच गुन्हेशाखेने २९ एप्रिल रोजी सीपी रेड्डींसमोर पुन्हा १२ पेक्षा जास्त गुंडांची पेशी केली. सर्व गुंडांचे अपडेअ बायोडाटा संगणीकृत केल्या जात आहे. तसेच रेकार्डवरील गुंडांना दररोज सकाळी संबधीत पोलिस ठाण्यात व्हिजीट देण्याचे सुचना देण्यात आले.शहरात गेल्या काही दिवसांपासून हत्या,हत्येचा प्रयन, लुटमारी, ऑनरोड जबरी चोरी, गँग चालविणे, गैंगवार घडवून आणण्याचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी सीपी नविनचंद्र रेड्डी आता चांगलेच फायर मोडवर आले आहे.
पोलिस आयुक्तांनी वसंत हॉलमध्ये आता शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकार्ड व हिट्रीशीटर आरोपींची पेशी घ्यायला सुरूवात केली आहे. तत्पूर्वी सीपींनी ठाणेदार, क्राईम पीआयची बैठक घेऊन तसे नियोजन व तयारी पूर्ण केली होती. विशेष म्हणजे सीपींच्या पेशीच्या भितीने रेकार्डवरील रंगबाज गुंडांनी शहरातून पलायन सुध्दा केले आहे. तरी देखील स्थानिक पोलिस व गुन्हेशाखा रेकार्डवरील गुंडांना पकडून त्यांची सीपींसमारे पेशी करित आहे.
आता पर्यंत शहरातील २२ गुन्हेगारांची सीपींसमोर पेशी झाली आहे. अशातच गुन्हेशाखेने आज वसंत हॉल येथे सीपी रेड्डींसमोर १२ पेक्षा जास्त गुंडांची पेशी केली. सर्व गुंडांचे अपडे अबायोडाटा संगणीकृत केल्या जात आहे. तसेच रेकार्डवरील गुंडांना दररोज सकाळी संबधीत पोलिस ठाण्यात व्हिजीट देण्याचे सुचना देण्यात आले.

गुंडांच्या पेशी दरम्यान डीसीपी कल्पना बारवकर, सागर पाटील, गणेश शिंदे, गुन्हेशाखेचे एसीपी शिवाजी बचाटे, गुन्हेशाखेचे पीआय गोरखनाथ जाधव, बाबाराव अवचार, सीपी स्पेशल स्कॉडचे प्रमुख पीआय आसाराम चोरमलेसह आदि अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते..

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!