देश

भारतातील इतिहासातील सर्वांत मोठा छापा ; ३५२ कोटी जप्त ; ट्रक भरुन पैसे

नोटा मोजायला तब्बल ३६ मशीन, १० दिवसांची रेड

भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा छापा ओडिशामध्ये टाकण्यात आलाय. हा छापा १० दिवस सुरु होता. या छाप्यात आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी दारु बनवणारी कंपनी, बौध डिस्टिलरीज प्राइवेट लिमिटेडच्या अनेक विभागांमध्ये छापेमारी केली आहे. या दरम्यान, ३५२ कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. अधिकृत माहितीनुसार, हा छापा १० दिवस चालला आणि मोठी रक्कम जप्त करण्यात आली. त्यामुळे याबाबत अनेक उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. आयकर विभागाकडून करण्यात आलेला हा आजवरचा सर्वात मोठा छापा आहे.

नोटा मोजण्यासाठी ३६ मशीनचा केला वापर

छाप्या दरम्यान, प्राप्तीकर विभागाने जमिनीखाली दडलेल्या मौल्यवान वस्तू ओळखण्यासाठी स्कॅनिंग व्हील असलेल्या मशीनचा वापर केला आहे. याशिवाय या ऑपरेशनसाठी ३६ नवीन मशीन्सची व्यवस्था देखील केली करण्यात आली होती. या मशीनचा वापर नोटा मोजण्यासाठी करण्यात आला होता. एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर प्राप्तीकर विभागाने वेगवेगळ्या बँकांतील कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावले होते. ही मोठी रक्कम मोजण्यासाठी आणि पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासली होती.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा गौरव

आयकर विभागाने छापेमारीनंतर जप्त केलेले पैसे ट्रकवर लोड केले आणि कडेकोट बंदोबस्तात विभागाच्या कार्यालयात जमा केले आहेत. या ऑपरेशनच्या यशानंतर आयकर विभागाची कार्यापद्धती आणि अधिकाऱ्यांच्या शिस्तबद्धतेचे सर्वांकडून कौतुक होतं आहे.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव

केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये या छाप्याचे नेतृत्व करणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सन्मानित केले होते. यामध्ये आयकर विभागाचे अन्वेषण संचालक एसके झा आणि अतिरिक्त संचालक गुरप्रीत सिंह यांचा समावेश होता. हा छापा केवळ आयकर विभागाच्या यशाचे प्रतीक ठरला नाही, तर भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्ध सरकारची कारवाई सुरूच असल्याचेही यातून सिद्ध झाले. दरम्यान, आयकर विभागातील या अधिकाऱ्यांचे सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!