तहसीलदार गीतंजली गरड व त्यांचे लिपिक यांना शेतीचा फेरफार घेण्यासाठी संबंधितांकडून लाचेची मागणी करणे चांगलेच महागात पडले असून लाच लुचपत विभागाकडून तहसीलदार गीतांजली गरड तसेच लिपिक यांच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे.
वडीलांचे नावे असलेल्या शेतीचे वाटणीपत्रानुसार फेरफार करणेबाबतचा आदेश काढून देणेकरीता किरण बेलसरे, लिपीक, तहसिल कार्यालय, चांदूर बाजार, जि. अमरावती यांनी स्वतः करीता व तहसिलदार श्रीमती गरड यांचेकरीता २५ हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रारदार यांनी दिनांक २८ मार्च २०२४ रोजी तकार दिली होती.
सदरच्या तकारीवरुन दिनांक २८ मार्च २०२४ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दम्यान किरण बेलसरे यांनी तडजोडीअंती २० हजार रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केले. तसेच दिनांक ०८ मे २०२४ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान महिला तहसिलदार गितांजली गरड, चांदूर बाजार, जि. अमरावती यांचे किरण बेलसरे, खाजगी इसम यांना लाच देण्यास प्रोत्साहन असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरुन नमुद दोन्ही आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन चांदूर बाजार, अमरावती ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे…
लाच लुचपत विभागाकडून नागरीकांनी अशाच प्रकारे भष्टाचार संबंधित माहिती देण्यासाठी, ऑफीस फोन नं. ०७२१-२५५३०५५, मो.न.७७४१९६७०४१ टोल फि नंबर-१०६४ अँटी करप्शन ब्युरो, ललीत सेंटर, परांजपे कॉलनी, अमरावती, यावर संपर्क करण्याचे आव्हान केले आहे.
Add Comment